एसबीआयमध्ये ३८५० जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख आणि इतर तपशील


नवी दिल्ली – पदवीधर उमेदवारांसाठी स्टेस बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने ३८५० पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे. बँकेने सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजेच सीबीओ पदासाठी अधिसूचना जारी केली असून १६ ऑगस्ट पूर्वी एसबीआयच्या सीबीओ भरती २०२० साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरुन दाखल करणे बंधनकारक आहे. ३८५० सीबीओ पदांसाठीही ही भरती म्हणजे बँकेमध्ये नोकरी करण्यासंदर्भातील तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून या पदासाठी फ्रेशर्सही अर्ज करु शकतात. या ३८५० पदांसाठी CRPD/ CBO/ 2020-21/ 20 अंतर्गत दिलेल्या अटींची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करु शकतात. याचसंदर्भातील अटी, निमय आणि महत्वाच्या तारख्यांबरोबरच कुठे किती पदांसाठी भरती होणार याचा तपशील जाणून घ्या.

या पदांसाठी अर्ज भरण्याची तारीख ही २७ जुलै २०२० ते १६ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे. अर्ज १६ ऑगस्टनंतर स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती ३८५० पदांसाठी आहे. त्यापैकी सर्वाधिक जागा या कर्नाटक आणि गुजरातमध्ये आहे. येथे प्रत्येकी ७५० सीबीओ पदांसाठी भरती आहे. त्या खालोखाल तेलंगणामध्ये ५५० जागा आणि मुंबई विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये ५१७ जागांसाठी भरती होणार आहे. राजस्थानमध्ये ३०० जागांसाठी, मध्य प्रदेशमध्ये २९६ जागांसाठी, छत्तीसगडमध्ये १०४ जागांसाठी, तामिळनाडू ५५ जागा तर गोव्यामध्ये ३३ जागांसाठी भरती होणार आहे.

या जागांसाठी शैक्षणिक पात्रतेची मर्यादा ही उमेदवाराने मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठामधून कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले हवे, अशी आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे वय हे १ ऑगस्ट २०२० पर्यंत ३० वर्षांपेक्षा अधिक असू नये अशीही अट ठेवण्यात आली आहे. एसबीआयच्या वेबसाईटवरुन इच्छुक उमेदवार १६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ईमेलआयडी आणि मोबाइल क्रमांकांबरोबरच इतर माहिती द्यावी लागणार आहे. एसबीआयच्या भरतीसंदर्भातील अधिक माहिती एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच www.onlinesbi.com वर मिळेल.