सरकारी नोकरी : एम्समध्ये नोकरीची बंपर संधी; मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पगार


नवी दिल्ली : नर्सिंग ऑफिसर पदासाठी ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेजमध्ये (AIIMS) मेगा नोकर भरती करण्यात येणार आहे. AIIMS Nursing Officer Recruitment नुसार 3803 पदांवर नियुक्ती केली जाणार असून सातव्या वेतन आयोगानुसार या नर्सिंग ऑफिसरना पगार मिळणार आहे.

नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट (NORCET) 2020 द्वारे ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. एम्सच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंडियन नर्सिंग काउंसिल, स्टेट नर्सिंग काउंसिल द्वारा मान्यताप्राप्त संस्थांमधून बीएससी नर्सिंग किंवा बीएससी (पोस्ट सर्टिफिकेशन)/पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग उत्तीर्ण केलेले असावे.

18 ते 30 वर्षे एम्स नर्सिंग ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवाराचे वय असावे. तर SC/ST वर्गासाठी 5 वर्षे आणि ओबीसीसाठी 3 वर्षे वयाची सूट दिली जाणार आहे. ऑनलाईन टेस्ट आणि मेरिट लिस्टनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी 3 तासांची परिक्षा असणार आहे. यामध्ये 200 मार्कसाठी 200 वैकल्पिक प्रश्न विचारले जाणार आहेत. या पदांसाठी जनरल, ओबीसीसाठी 1500 रुपये आणि SC/ST साठी 1200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 18 ऑगस्ट 2020 अशी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असून परिक्षा 1 सप्टेंबर 2020 ला घेतली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी aiimsexams.org वर जाऊन 18 ऑगस्ट 2020 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.