कोरोनाच्या संकटकाळात या देशाला शाळा सुरु करण्याची घाई नडली, तब्बल 97 हजार मुले बाधित


वॉशिंग्टन – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातलेले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश अद्यापही लॉकडाऊनमध्ये आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घेता शाळा, कॉलेज आणि मॉलसारख्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण आता बऱ्याच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जगभरातील वेगवेगळ्या देशांनी आपल्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी जुलैच्या शेवटच्या 15 दिवसांत अमेरिकेत सुमारे 97,000 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले असून यासंदर्भातील आकडेवारी अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात जाहीर केली.

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत एकूण 50 लाख संक्रमित लोकांपैकी सुमारे 3 लाख 38 हजार मुले आहेत. अनेक तज्ज्ञांनी ही आकडेवारी समोर आल्यानंतर शाळा उघडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत केवळ जुलैमध्येच सुमारे 25 मुलांचा मृत्यू झाला. त्याचवेळी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांपासून कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन शाळा उघडल्या पाहिजेत. त्याचबरोबर पालकांनी मुलांना शाळेत किंवा रिमोट लर्निंगकडे पाठवावे, असा पर्याय अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांच्या पालकांना हा पर्याय दिला जात आहे.