सावधान… वाढतो आहे कोरोनाचा प्रकोप! काल दिवसभरात तब्बल ६४ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ


नवी दिल्ली – २१ लाखांचा टप्पा देशातील कोरोनाबाधित रग्णांच्या संख्येने ओलाडंला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या दिवसागणिक वाढत्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत देशात २१ लाख ५३ हजार ११ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत वाढली आहे. देशात मागील २४ तासांत ६४ हजार ३९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या सहा लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दुपटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ लाख ८० हजार ८८५ एवढी आहे. पण त्याचवेळी चिंतेची बाब म्हणजे ४३ हजार ३७९ एवढी एकूण कोरोनाबळींची संख्या आहे. महाराष्ट्रात एक लाख ४७ हजार ३५५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ही संख्या सर्वात मोठी आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार ८ ऑगस्ट रोजी सात लाख १८ हजार ३६४ कोरोना चाचणी घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात दोन कोटी ४१ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.