काय आहे टेबलटॉप रनवे, कोझिकोडमध्ये का झाली विमान दुर्घटना ?

केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 पायलटसह 18 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमानतळ भारताच्या टेबलटॉप रनवेमध्ये समाविष्ट आहे. या विमानतळाचे नाव कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, हे कोझिकोड शहरापासून 28 किमी लांब करीपूर येथे आहे. दुबईवरून परततान हे विमान रनवेवर घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांच्यानुसार, विमानात 190 प्रवासी होती.

टेबलटॉप रनवे म्हणजे काय ?

टेबलटॉप रनवे हे डोंगराळ भागातील विमानतळावर बनवले जातात. हे रनवे सर्वसाधारण विमानतळाच्या रनवेपेक्षा खूप लहान असतात. या रनवेवर विमान उतरवणाऱ्या पायलट्सना खास प्रशिक्षण दिले जाते. कारण या रनवेच्या दोन्हीबाजूला किंवा एका बाजूला दरी असते. त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. पाऊस आणि धुक्याच्या वातावरणात अशा रनवेवर दुर्घटना घडू शकते.

भारतातील टेबलटॉप रनवे –

भारतात तीन विमानतळांवर टेबलटॉप रनवे आहेत. यात केरळचे कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्नाटकच्या मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरममधील लेंगपुई विमानतळाचा समावेश आहे. या विमानतळांवर रनवे डोंगरावर असल्याने लँडिंग करताना पायलटला मैदानी भागासारखा दृष्टी भ्रम होतो. पावसाळ्यात येथे विमान घसरण्याची शक्यता असते.

भारतातील टेबलटॉप रनवेच्या घटना-

याआधी 2010 साली मंगळुरू येथील विमानतळावर देखील दुबईवरून येणारे एअर इंडियाचे विमान घसरून दरीत कोसळले होते. या घटनेत जवळपास 150 लोकांचा मृत्यू झाला होता.

विमानतळ मानक रूंदी –

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मते, लांब, मोठी विमाने वापरणाऱ्या विमानतळाचा रनवे 240 मीटर असावा. तर कालीकट विमानतळाचा रनवे अवघ्या 90 मीटरचा आहे. अशा परिस्थितीत लँडिंग दरम्यान अपघात होण्याचा धोका असतो.