अयोध्येतील मशिदला बाबरचे नाव दिले जाणार नाही – सुन्नी वक्फ बोर्ड

अयोध्येतील राम मंदिरच्या भूमिपूजनच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिराचे काम सुरू झाले आहे. याआधी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर मशिदीसाठी 5 एकर जमीन देण्यात आली आहे. आता सुन्नी वक्फ बोर्डाने स्थापन केलेल्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने प्रेस नोटद्वारे हे स्पष्ट केले आहे की बाबरच्या नावाने अयोध्येत कोणतीही मशिद किंवा रुग्णालय बांधले जाणार नाही. ट्रस्टने म्हटले आहे की पाच एकर जागेवर एक रुग्णालय, संशोधन केंद्र आणि लायब्ररी तयार केली जाईल.

बोर्डाने सांगितले की, केलेल्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली जाईल. ज्याचा उद्देश अयोध्यातेली धनीपूर येथे देण्यात आलेल्या 5 एकर जमिनीचा उपयोग करून निर्माणकार्य करणे हा असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर मिळालेल्या या जमिनीवर एक मशीद, एक सांस्कृतिक केंद्र, हॉस्पिटल आणि लायब्ररी उभारली जाईल.

मशिद उभारण्यासाठी दिलेली ही जागा अयोध्या जनपदच्या सोहावल तहसीलमधील जनपद मुख्यालयापासून 18 किमी लांब लखनऊ-गोरखपूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या धनीपूर येथे आहे.