सुशांत प्रकरणाचा तपास अद्याप सीबीआयकडे गेलेला नाही, अनिल देशमुख यांची माहिती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाचा तपास अद्याप सीबीआयकडे सोपविण्यात आला नसल्याची माहिती, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. एनडीटिव्हीशी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात व न्यायालयाचा निर्णय 11 ऑगस्टला येणार आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास करत असून, ते हे काम योग्यरित्या करण्यास सक्षम आहेत.

अनिल देशमुख म्हणाले की, पोलीस व्यवस्थित या प्रकरणाचा तपास करत असून, सीबीआयकडे प्रकरण सोपविण्याचे कोणतेही कारण नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असून, 11 ऑगस्टला निर्णय येईल.

दरम्यान ईडी देखील या प्रकरणात चौकशी करत असून, ईडीने काल सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची जवळपास 8 तास चौकशी केली. रियाच्या वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्तीची देखील चौकशी करण्यात आली.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, सुशांतचे ज्या ज्या बँकेत खाते होते, तेथील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जाईल. एजेंसीला रियाच्या खात्यात 15 कोटी रुपये मिळालेले नाहीत.