मोदी सरकार मध्यमवर्गीयांना लवकरच देणारे मोठे गिफ्ट, करदात्यांची वाढणार ताकद

कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांना मोदी सरकार लवकरच एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना सीतारमण म्हणाल्या की, करदाता हे राष्ट्र निर्माता असून, सरकार त्यांच्यासाठी एक चार्टर ऑफ राइट्स आणणार आहे.

सीतारमण यांनी सांगितले की, देशात खूप मोजकेच देश आहेत जेथे चार्टर ऑफ राइट्स आहे. यात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. या चार्टर ऑफ राइट्समध्ये करदात्यांचे दायित्व आणि अधिकारांचा उल्लेख असेल.

बजेटमध्ये टॅक्सपेयर्स चार्टरची घोषणा करण्यात आली होती. याला घटनात्मक दर्जा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आयकर विभागाकडून वेळोवेळी नागरिकांची सेवा सुनिश्चित होईल.

यात करदात्यांना काही नवीन अधिकार मिळू शकतात. मात्र अद्याप सीतारमण यांनी या चार्टर ऑफ राइट्सबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यांनी सांगितले की, करदातांसाठी आम्ही कर प्रक्रिया वारंवार सरळ आणि सोपी करत आहोत.