मुंबईत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तरुणांनी लुटला पोहण्याचा आनंद, व्हिडीओ व्हायरल

मुंबईसह उपनगरामध्ये मागील 2 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू होता. मुसळधार पावसाने मुंबईलाअक्षरशः झोडपून काढले. मुंबईतील अनेक भागात गुडघाभर पाण साचले होते. रेल्वे सेवा खंडीत झाली होती. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. अशा स्थितीमध्येही काहींनी मात्र या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. या पावसाच्या साचलेल्या पाण्यात अनेक तरुणांनी चक्क पोहण्याचा आनंद घेतला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी नितीन सांगवान यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की पाणी साचलेल्या रस्त्यावर बस अर्धी बुडाली आहे व त्याच्या टपावर काही तरूण उभे आहेत. बसच्या टपावरून ही मुले साचलेल्या पाण्यात उड्या मारत आहेत. अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जर आयुष्य तुम्हाला संधी देत असेल, तर त्या संधीचा नक्की फायदा उचला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 6 हजारांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटकरी यावर मजेशीर प्रक्रिया देत आहेत.