मुंबई बॉम्बस्फोटाला जबाबदार डी कंपनीला पाकिस्तानचे संरक्षण – भारत

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सुत्रधार दाऊद इब्राहिम आणि संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित करण्यात आलेले अन्य दहशतवादी शेजारील देशांच्या संरक्षणात असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षे परिषदेत म्हटले आहे. सोबतच भारताने फरार कुख्यात गुन्हेगार, लश्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांद्वारे निर्माण झालेला धोका नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करायला हवेत, असेही म्हटले आहे.

दहशतवाद आणि संघटित गुन्हे यांच्या संबंधांमधील मुद्यांवरील उपाय या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय चर्चेत भारताने आपले मत मांडले. भारताने म्हटले की, भारत सीमेपलीकडील प्रायोजित दहशतवादाने त्रस्त होता. संघटित गुन्हेगारी सिंडीकेट डी कंपनी, जी सोने आणि बनावट नोटांची तस्करी करत असे, ते एका रात्रीत दहशतवादी संघटनेत बदलले. त्यांनी 1993 मधील मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवले. या घटनेत 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो-कोट्यावधीचे नुकसान झाले.

भारताने कोणाचेही नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, मुंबई बॉम्बस्फोटाचा सुत्रधार एका शेजारील देशाच्या संरक्षणात आहे. यात काहीही आश्चर्य नाही, ती जागाच शस्त्रांची तस्करी, अमली पदार्थांचा व्यापार आणि संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचा गड आहे.