तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीची बदनामी करणे बंद करा, दिशा सालियानच्या आईने सांगितले

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत चालली आहे. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सुशांतच्या आत्महत्येआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियानने 9 जून आत्महत्या केली होती. ही दोन्ही प्रकरणे आता एकमेकांना जोडली जात आहेत. अनेक नेत्यांनी या दोन्ही प्रकरणाची लिंक जोडली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

आता आज तकशी बोलताना दिशाच्या पालकांनी आपले म्हणणे मांडले आहे. दिशाचे पालक म्हणाले की, माझ्या मुलीला बदनाम करून स्वतःचा फायदा करून घेऊ नका. तिच्यासोबत खेळू नका. ती आमची एकमेव मुलगी आहे. आता ते लोक तिची प्रतिमा पुर्णपणे खराब करत आहेत. ते लोक आम्हाला अशाप्रकारे त्रास देऊन मारू इच्छित आहेत.

दिशाच्या आई वसंती सालियान या म्हणाल्या की, मी भारतातील लोकांना, सर्व मीडिया, सोशल मीडिया, युट्यूब आणि अन्य सर्वांना सांगू इच्छिते की हे सर्वकाही खोटे आहे. सर्व बातम्या बनावटी आणि केवळ अफवाह आहेत.

दिशासोबत बलात्कार आणि हत्येच्या थेअरीला देखील त्यांना चुकीचे म्हणत हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. सोबतच पोलीस आपले काम योग्यरित्या करत असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, राजकीय नेते ज्या लोकांची नावे घेत आहेत, त्यांचा माझ्या मुलीशी काहीही संबंध नव्हता. ती त्यांना भेटली देखील नाही व त्यांचा नंबर देखील नव्हता. त्यांच्यासोबत एक फोटो देखील नाही. तरी देखील तिला या प्रकरणात ओढले जात आहे. आम्ही या लोकांविरोधात तक्रार दाखल करू शकतो, मात्र आम्ही करणार नाही. पार्टीबाबत जे आरोप आहेत ते देखील खोटे आहेत.