डायनॉसोरला देखील होत असे कॅन्सर, संशोधनात समोर आली हैराण करणारी माहिती

डायनॉसोरबाबत आतापर्यंत अनेक संशोधन झाले आहे. मात्र आता डायनॉसोरला कॅन्सरसारखे धोकादायक आजारांचा देखील सामना करावा लागल्याची माहिती पहिल्यांदाच संशोधनात समोर आली आहे. 7.6 कोटी वर्षांपुर्वीच्या डायनॉसोरच्या हाडाला फ्रॅक्चर समजले जात होते, त्यात मेलिगनेंट कॅन्सर आढळला आहे. हे हाड 1989 मध्ये कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील डायनॉसोरचे अवशेष म्हणून सापडले होते.

Image Credited – Aajtak

टोरंटो येथील रॉयल ओंटेरियो म्यूझियमचे जीवाश्मतज्ञ डेव्हिड इव्हांस यांच्यानुसार डायनॉसोरचे हे हाड 6 मीटर लांब असून, ते क्रेटिशियस काळातील आहे. त्या काळात चार पाय असणारे शाकाहारी डायनॉसोर असायचे. डायनॉसोरचे हे हाड मागील पायाचे आहे. या हाडात सफरचंदाच्या आकारापेक्षाही मोठा कॅन्सरचा ट्यूमर आढळला आहे.

Image Credited – Aajtak

अँटेरियो यूनिव्हर्सिटीचे संशोधक डॉक्टर मार्क क्राउथर यांच्यानुसार, अने अनेक ट्यूमर मऊ टिश्यूजमध्ये असतात. त्यामुळे जीवाश्मामधून आपल्याला कॅन्सरचे प्रमाण मिळाले आहे. संशोधनात आढळले की, कॅन्सर काही नवीन आजार नसून, हे प्राण्यांमध्ये देखील आढळत असे.

Image Credited – Aajtak

डॉक्टर मार्क म्हणाले की, ऑस्टेरियोसारकोमा हाडांमध्ये होणारा एक प्रकारचा कॅन्सर आहे. जो सर्वसाधारणपणे लहान मुले आणि युवकांना होतो. या संशोधनात डायनॉसोरला देखील याचा धोका होता, असे आढळले आहे. इव्हांस यांनी सांगितले की, हाडांमध्ये जो ट्यूमर होता, त्याला स्पष्ट क्षमता असणाऱ्या सिटी स्कॅनने तपासले. त्यात कॅन्सर हाडाला चिकटल्याचे आढळले. डायनॉसोरचा मृत्यू भलेही कॅन्सरमुळे झालेला नसला, तरीही त्यामुळे चालण्या-फिरण्यावर परिणाम झाला असेल.