निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव करण्यासाठी चीन बनवत आहे रणनिती, अधिकाऱ्याचा दावा

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडणार आहे. सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा निवडून येतील की नाही हे तेव्हाच कळेल. दुसरीकडे, अमेरिके कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, तेथे सर्वाधिक मृत्यू झाले आहे. चीनसोबत देखील त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. आता एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आले आहे की, ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदी निवडून यावे, असे चीनला वाटत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी चीन रणनिती बनवत आहे.

अमेरिकेचे मुख्य गुप्तचर अधिकारी आणि नॅशनल काउंटर इंटेलिजेंस अँड सिक्युरिटी सेंटरचे संचालक विलियम इव्हानिना यांनी राष्ट्रपती निवडणुकीत परदेशी हस्तक्षेपाविषयी अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. विलियम यांनी म्हटले आहे की, रशिया, चीन आणि इराण आगामी निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे.

विलियम म्हणाले की, रशिया ट्रम्प यांच्याविरोधातील उमेदवार बिडेन यांच्याविरुद्ध काम करत असून, मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. रशिया ट्रम्प यांची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ट्रम्प पुन्हा राष्ट्रपती बनावे अशी चीनची इच्छा नाही. मात्र चीन रशिया एवढ्या प्रमाणात सक्रिय नाही.

चीन नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. जे चीनच्या हिताच्या विरोधात आहेत, अशा नेत्यांवर दबाव वाढवत आहेत. इराण देखील ट्रम्प यांच्या पराभवासाठी जोर देत आहे. इराण ट्रम्प आणि अमेरिकाविरोधात सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहे. ट्रम्प विजयी झाल्यावर त्यांच्यावरील दबाव कायम राहील, असे वाटत असल्याने इराण हे करत आहे.