‘सैन्यासाठी गवतही खायला तयार, पण…’, शोएब अख्तरला उफाळून आले सैन्य प्रेम

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता अख्तरने आपल्या देशातील सैन्याबाबत बोलताना केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. सैन्याचे बजेट वाढविण्यासंदर्भात बोलताना अख्तर म्हणाला की, जर अल्लाहने मला अधिकार दिला तर मी स्वतः गवत देखील खाईल, पण सैन्याचे बजेट नक्की वाढवेल.

अख्तर म्हणाला की, मला समजत नाही की देशातील सर्वसामान्य नागरिक सैन्यासोबत मिळून काम का करत नाहीत. माझ्याकडे जर अधिकार असेल तर मी लष्करप्रमुखांसोबत बसेल आणि बजेट 20 टक्के असेल तर ते 60 टक्के करेल. आपण जर एकमेकांचा अपमान करत राहिलो, तर नुकसान आपलेच आहे.

शोएबने दावा केला की, 1999 च्या कारगिल युद्धानंतर मी देशासाठी गोळ्या खाण्यासही तयार होतो. तेव्हा काउंटी क्रिकेटचा लाखो रुपयांचा करार नाकारला होता.