व्हॉट्सअ‍ॅप आणणार जबरदस्त फीचर, अ‍ॅपमध्येच पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ

इंस्टंट मेसेजिंग सर्व्हिस अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजरसाठी नवनवीन फीचर लाँच करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी एका फीचरवर काम करत असून, या फीचरद्वारे शेअरचॅट युजर्सला पिक्चर इन पिक्चर मोडमध्ये व्हिडीओ पाहता येईल. शेअरचॅटचे व्हिडीओ आयओएस आणि अँड्राईडच्या बिटा व्हर्जनवर उपलब्ध होईल.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर वापरण्यासाठी युजरला आयओएसचे 2.20.81.3 आणि अँड्राईडचे 2.20.197.7 व्हर्जन इंस्टॉल करावे लागले. या फीचरच्या मदतीने जेव्हा युजर शेअरचॅट व्हिडीओ आयकॉनवर टॅप करतील, त्यावेळी व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपच्या पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये स्टार्ट होईल.

सोशल प्लॅटफॉर्म शेअरचॅट हिंदी, मराठीसह 15 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.  WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचरवर काम करत आहेत. ज्यात आपोआप मेसेज डिलिट होणारे फीचर देखील आहे.