ऐवढे पैसे देऊन ३६ महिने वापरा टाटाची १५ लाखाची नवीकोरी कार अन् द्या परत


आपल्यापैकी अनेकांचे स्वतःची गाडी घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच रहाणार की काय अशी शंका कधी कधी मनात येते. कारण सध्याच्या परिस्थितीत वाढत्या महागाईमुळे आपल्याला आपल्या घराचे बजेच संभाळतानाच तारे वरची कसरत करावी लागते, मग त्यात गाडी कशी घेणार असा प्रश्न उभा रहातो, पण आता टेंशन घेऊ नका. कारण तुमचे गाडीचे स्वप्न टाटा मोटर्स पूर्ण करणार आहे. त्यानुसार १५ लाखाहून अधिक किंमतीची टाटाची कार आपण भाड्याने घेऊ शकता. यासाठी कंपनी स्वतः ग्राहकांना कार भाड्याने देत आहे. वास्तविक, आपल्या इलेक्ट्रिक कार Nexon EVसाठी (नेक्सन ईव्ही) टाटा मोटर्सने सब्सक्रिप्शन योजना सुरू केली आहे.

याबाबत कंपनीचे असे म्हणणे आहे की, ही योजना त्या ग्राहकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना काही काळापूरते एका शहरात वास्तव्य करायचे आहे आणि त्यांना त्या दरम्यान कारची आवश्यकता असते. परंतु त्यांची एवढ्या कमी काळासाठी कार खरेदी करण्याची इच्छा नसते. सध्या १८ महिने, २४ महिने आणि ३६ महिन्यांसाठी ही योजना कंपनीने सुरू केली आहे.

जर ग्राहकांना टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार १८ महिन्यांसाठी भाड्याने घ्यायची असेल तर त्यांना दरमहा ४७ हजार ९०० रुपये द्यावे लागतील. २४ महिन्यांच्या योजनेसाठी दरमहा ४४ हजार ९०० रुपये भाडे द्यावे लागेल. तर ३६ महिन्यांसाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनवर दरमहा ४१ हजार ९०० रुपये द्यावे लागतील. सबस्क्रिप्शन संपल्यानंतर, ग्राहक एकतर आपली योजना वाढवू शकतात किंवा कार कंपनीला परत देऊ शकतात.

तसेच या सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक कारची मागणी देखील वाढेल. टाटाने यासाठी ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. दरमहा भाडे वगळता ग्राहकाला इतर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यांना फक्त कार चार्ज करायची आहे आणि चालवायची आहे.

टाटाची ही कार एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ३१२ किमी धावू शकते. ३०.२ किलोवॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी यात देण्यात आली आहे. त्याची बॅटरी ८ तासात पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. तर तासाभरात वेगवान चार्जरद्वारे ८० टक्के बॅटरी चार्ज केली जाऊ शकते.

गाडीच्या वेगाबाबत बोलायचे झाल्यास, फक्त ९.९ सेकंदात ईव्ही ०-१०० किमी वेग पकते. टाटा नेक्सन ईव्हीची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत १३.९९ लाख रुपये आहे, तर ऑन रोड किंमत १५ लाख ६३ हजार ९९७ रुपये आहे. टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १५.९९ लाख रुपये आहे. सध्या देशातील मोठ्या शहरांमध्ये टाटा मोटर्सची ही खास सबक्रिप्शन योजना उपलब्ध आहे. यात दिल्ली / एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरूचा समावेश आहे.