देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखांच्या पार


नवी दिल्ली – देशातील कोरोबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढतच असताना, आता त्यात ५०-५५ हजारांनी दरदिवशी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६२ हजार ५३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. २० लाख २७ हजार ७५ ऐवढी देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे.

पण या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत देशात १३ लाख ७८ हजार १०६ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात सहा लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात ४१ हजार ५८५ जणांचा बळी गेला आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असून ती ५० लाखांपेक्षा जास्त आहे, तर २८ लाखांपेक्षा जास्त ब्राझिलमध्ये तर २० लाखांपेक्षा जास्त भारतात झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतील रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातील २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.