दिलेल्या शब्दाला जागणार सोनू सूद, देणार 1 लाख स्थलांतरित मजूरांना नोकऱ्या

आपल्या अभिनयाने लोकांचे मन जिंकणारा बॉलिवूड अभिनेता कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात आपल्या कार्याने लोकाचें मन जिंकत आहे. आधी त्याने परराज्यात अडकलेल्या हजारो कामगारांना घरी जाण्यासाठी मदत केली. त्यानंतर आता अनेकांना रोजगार मिळवून देण्यास मदत करत आहेत.  

सोनू सूदने ट्विट करत माहिती दिली की, जेथे इच्छाशक्ती असते, तेथे मार्ग असतो. माझ्या प्रवासी भावांसाठी मी आता APEC सोबत भागीदारी केली आहे. pravsirojgar.com च्या माध्यमातून देशभरातील अपेरल मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपर्ट कंपन्यांमध्ये 1 लाख नोकरी देण्याचे वचन देतो. धन्यवाद, जय हिंद !

याआधी सोनू सूदने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 30 जुलैला 3 लाख नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते. सोनूने ट्विट केले होते की, माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने माझ्या प्रवासी भावांसाठी pravsirojgar.com चे 3 लाख नोकऱ्या देण्याचे वचन. हे सर्व चांगला पगार, पीएफ, ईएसआय आणि अन्य लाभ प्रदान करतात. धन्यवाद एईपीसी, सिटी, ट्रिडेंट, क्यूस कॉर्प, अ‍ॅमेझॉन, सोडेक्सो, अर्बन, पोर्टिया आणि इतर सर्वांचे.

सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात केवळ भारतीयच नाही तर, परदेशात अडकलेल्या लोकांना मायदेशी परत आणण्यासाठी देखील मदत करत लोकांचे मन जिंकले आहे.