राम मंदिर : असदुद्दीन ओवेसींच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल

अयोध्येतील राममंदिरावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर वक्तव्य करणारे एमआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ओवेसी यांचे वक्तव्य न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करणे आणि अपमान करणारे असल्याचे म्हणत न्यायालयात सर्वोच्च न्यायालया अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या वक्तव्यांना हिंदूच्या भावनांना ठेस पोहचवणारे आणि मुसलमानांना भडकवणारे असल्याचे म्हणत कारवाईची मागणी केली जात आहे.

अँटी-टेररिस्ट फ्रंट इंडियाचे अध्यक्ष विरेश सांडिल्य आणि एका वकिलाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ओवेसी यांनी अयोध्यामध्ये भूमिपूजनाआधी एका न्यूज चॅनेलवर न्यायालयाचे पावित्र्य आणि बुद्धिमत्तेबाबत अपमानजनक वक्तव्य केले. याचिकेत म्हटले आहे की, 30 जुलैला ओवेसी यांनी केलेल्या विधानामुळे प्रभू रामावर आस्था असणाऱ्या कोट्यावधी भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

याचिकेत म्हटले आहे की, राष्ट्रीय टेलिव्हिजनवर ओवेसी यांनी केलेले वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा अनादर आहे व त्यांचा भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही हे यातून दिसते. याचिकाकर्त्यांनी ओवेसी यांच्याविरोधात अवमान प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.