आता मध्य-आशियातील गरीब देशांच्या भूभागावर चीनचा डोळा


पेइचिंग – भारतातील लडाख आणि दक्षिण चीन समुद्रातील शेजारील देशांच्या भूभागावर कब्‍जा करण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या चीनने आता मध्‍य-आशियातील गरीब देशांमध्येही घुसण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात चीनमधील अधिकृत माध्यमांनी तजाकिस्‍तानच्या ‘पामीर’ पहाडांवरच आता दावा सांगण्यास सुरुवात केल्यामुळे मध्य-आशियातील या अत्यंत गरीब देशाची चिंता वाढली आहे. 2010 मध्ये चीन आणि तजाकिस्‍तान दरम्यान एक करार झाला होता. त्यानुसार तजाकिस्तानला पामीर भागाचा 1 हजार 158 किलो मीटर एवढा प्रचंड भू-भाग नाईलाजास्तव चीनला द्यावा लागला होता.

चीनमधील काही माहितीच्या आधारे चिनी इतिहासकार चो याओ लू यांनी दावा केला आहे, की पामीरचा संपूर्ण भाग चीनचाच असल्यामुळे तो चीनने परत मिळवायला हवा. यासंदर्भात चीनच्या सरकारी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या या लेखामुळे तजाकिस्‍तानमधील अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. आता रशियाचेही लक्ष चीनच्या या दाव्यानंतर या प्रकरणाकडे वळले आहे. कारण, मध्‍य-आशियातील देशांना रणनीतीच्या दृष्टीने रशिया आपला भाग मानतो.

तजाकिस्‍तान आणि अफगानिस्‍तानच्या सीमेवर ताशकुर्गानजवळ चीन एक एअरपोर्ट तयार करत असल्यामुळे दुशांबेची चिंता अधिक वाढली आहे. यासंदर्भात चिनी इतिहासकाराने म्हटले आहे, की चिनी राज्‍याच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम आपल्याला आपण गमावलेली भूमी परत मिळवावी लागेल. आपण काही भूभाग परत मिळवला आहे. तर काही अद्यापही शेजारील देशांच्या ताब्यात आहे. यांपैकी पामीरही एक प्राचीन भाग आहे. जो 128 वर्षांपासून जगाच्या दबावामुळे आपल्यापासून वेगळा आहे.

त्याचबरोबर सोन्याच्या भांडारांसंदर्भातही चीन सरकार तजाकिस्‍तान सरकारसोबत चर्चा करत आहे. चिनी वृत्तांनुसार, जवळपास 145 सोन्याचे भांडार तजाकिस्‍तानातच आहेत. चिनी कंपन्यांना या खानींना विकसित करण्याचा आणि खोदकाम करण्याचाही अधिकार तजाकिस्‍तान सरकारने दिला आहे. आता या तणावावर आता जे अधिकारी लक्ष देऊन आहेत ते म्हणतात, चीनची ही जुनीच खेळी आहे, रस्ते आणि एअरपोर्टच्या माध्यमाने ते तजाकिस्‍तानच्या बाजूला अधिक जमिनीवर दावा करू शकतात.