मुंबई महानगरपालिकेचा नवा प्रयोग; आता आवाजावरुन केली जाणार कोरोना चाचणी


मुंबई – कोरोना चाचणीसाठी आतापर्यंत सर्वसामान्यपणे स्वॅब घेतले जातात हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण आता चक्क आवाजावरुनही कोरोना रुग्णाची ओळख होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने कोरोना संसर्गाच्या तपासासाठी अँटिजन आणि अँटिबॉडी तपासणीनंतर आता आवाजाची तपासणी करण्याचाही निर्णय घेतला आहे. ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान या नव्या प्रयोगात केले जाऊ शकते, अशी माहिती मुबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

या चाचणीसाठी आता नेस्को जम्बो कोरोना केंद्रामध्ये हजार रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेतले जातील. वैद्यकीय तज्ज्ञांचे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आवाज बदलतो असे निरिक्षण आहे. स्वरयंत्रणेवर या व्हायरसचा कशा प्रकारचा परिणाम होतो, कोरोना झाल्याची लक्षणे असतील तर आवाजावर परिणाम होऊ शकतो का, या सर्व दृष्टींनी विशेष अभ्यास केला जाणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान आवाजाच्या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटांमध्ये होणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसआर चाचणीने निदान पक्के केले जाणार असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे. यामुळे आता घेतला जाणार आवाज एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतात तेव्हा त्यांना श्वसनाचा त्रास होतो. या सर्व प्रक्रियेमध्ये फुफ्फुसांच्या स्नायूंवर प्रभाव पडतो. स्नायूंना सूज येते. त्यामुळे आवाजही बदलतो. आवाजावर परिणाम झाल्यामुळे त्यात बदल होतो आणि याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तिला कोरोना झाला की नाही हे तपासले जाऊ शकते.