Kiaची मेड इन इंडिया कॉम्पॅक्ट SUV Sonet भारतात लाँच; जाणून घ्या फिचर्स


नवी दिल्ली : भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये Kia Motorsने आपली मेड इन इंडिया कॉम्पॅक्ट SUV Kia Sonet लाँच केली आहे. यंदाच्या सर्वाधक चर्चेत असलेल्या कारपैकी एक ही कार आहे. कियाची भारतातील ही तिसरी कार असून कंपनीने याआधी Kia Seltos आणि Kia Carnival बाजारात आणली आहे. मंदीतही यापैकी सेल्टॉसने मोठी विक्री नोंदविली होती.

खासकरून भारतीयांसाठी Kia Sonet ला बनविण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील प्रकल्पामध्ये ही कार बनविण्यात आली आहे. ही कार येथूनच जगभरात पाठविली जाणार आहे. या कारला कंपनीने कनेक्टेड कार म्हणून समोर आणले आहे. iMT आणि व्हायरस प्रोटेक्शनसारख्या हाय़टेक फिचरने युक्त ही कार आहे.

या कॉम्पॅक्ट SUV Kia Sonet मध्ये कियाने 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. याशिवाय Bose ची 7 स्पीकर सिस्टीम, इलेक्ट्रीक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आले आहेत. या कारला स्मार्टवॉचने देखील कनेक्ट करता येणार आहे.

तीन इंजिन ऑप्शन कियाच्या या कारमध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चा पर्याय मिळणार आहे. Kia Sonet GT Line मध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळणार आहे.

सेफ्टीफिचर्सही Kia Sonet देण्यात आले आहेत. 6 एअरबॅग, ABS, EBD, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे फिचर आहेत. मारुतीच्या ब्रेझा, इकोस्पोर्ट, नेक्सॉन, व्हेन्यूला कियाची Kia Sonet ही कार टक्कर देणार आहे.