फेसबुकने जुलै 2021 पर्यंत वाढवला वर्क फ्रॉम होमचा कालावधी, सोबतच मिळणार 1000 डॉलर्स

दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढवला आहे. याआधी गुगलसह अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा कालावधी पुढील वर्षीपर्यंत वाढविण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.

फेसबुकने सांगितले की, कर्मचारी जुलै 2021 पर्यंत घरून काम करू शकतात. सोबतच या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेसाठी कंपनी 1000 डॉलर देखील देणार आहे. कंपनीचे प्रवक्ता ननेका नॉर्व्हिलने सांगितले की, आरोग्य विशेषज्ञ आणि सरकारच्या सल्ल्यानुसार आणि कंपनीच्या अंतर्गत चर्चेनंतर आम्ही कर्मचाऱ्यांचा वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच कंपनी होम ऑफिससाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंसाठी 1000 डॉलर दिले जातील.

रिपोर्टनुसार, फेसबुकचे जवळपास 48000 कर्मचारी मार्चपासून घरूनच काम करत आहेत. कंपनीने याआधी वर्क फ्रॉम होमचा कालावधी या वर्षीच्या अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कंपनीने पुन्हा एकदा हा कालावधी वाढवला आहे.

फेसबुकने याआधी देखील काम कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम करण्यासंदर्भात इशारा केलेला आहे. कंपनीचे संस्थापक मार्क झुकरेबर्गने म्हटले होते की कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरून काम करण्यास सांगू शकते.