तज्ज्ञांचा दावा; आपातकालिन स्थितीत कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी ठरणार ‘Aviptadil’


संपूर्ण जग कोरोनाच्या सकंटासमोर हतबल झालेल असतानाच अनेक देशातील संशोधक या महामारीतून बाहेर पडण्यासाठी त्याचबरोबर या रोगाचा समूळ नाश करणारे औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण अद्याप पर्यंत जगभरात कोरोनाला रोखणारे कोणतेही औषध अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यातच गंभीर आजारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे. पण आता तज्ज्ञांनी नुकत्याच केलेल्या दाव्यानुसार कोरोना प्रतिबंधक लस या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी एका नवीन औषधाला अमेरिकेतील आरोग्य संस्थेने परवानगी दिली आहे.

आरएलएफ-100 (RLF-100) असे या औषधाचे नाव आहे. एविप्टाडिल (Aviptadil) नावाने या औषधाला ओळखले जाते. या औषधांचा वापर अमेरिकेतील ह्यूस्टन शहरातील रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारांदरम्यान केला आहे. गंभीर स्वरुपात आजारी असलेले रुग्ण म्हणजेच ज्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. अशा रुग्णांवर या औषधाच्या वापरामुळे सकारात्मक बदल झालेला दिसून आला आहे. आपातकालिन स्थितीत कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधाच्या वापराला अमेरिकेतील खाद्य आणि औषधी प्रशासन म्हणजे एफडीएने परवागनी दिली आहे. इतर माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार न्यूरोएक्स आणि रिलीफ थेराप्यूटिक्सने मिळून हे औषध तयार केले असून न्यूरोएक्स ही औषध तयार करणारी कंपनी आहे.

संधोधकांनी दिलेल्या माहितीनुसार फुफ्फुसांच्या पेंशींमध्ये मोनोसाईट्समध्ये कोरोना व्हायरसची वाढ होण्यापासून हे औषध रोखते. रिपोर्ट्सनुसार कोरोनाच्या संक्रमणाने ५४ वर्षीय व्यक्ती गंभीर स्वरुपाचा आजारी होता. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. हे औषध या रुग्णाला देण्यात आले. हे औषध दिल्यानंतर चार दिवसांच्या आत त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवरून हलवण्यात आले. त्याचबरोबर १५ पेक्षा जास्त अन्य कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

दरम्यान लुपिन कंपनीने बुधवारी कोविहॉल्ट ब्रँण्ड नावाने बाजारात औषध उतरवले आहे. कोरोनाच्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी हे औषध फायदेशीर ठरेल. फार्मा कंपनी लुपिने दिलेल्या माहितीनुसार DCGI कडून आपातकालीन स्थितीत या औषधाच्या वापरासाठी फेविपिरावीरला परवानगी मिळाली आहे. कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध २०० मिलिग्रामच्या १० गोळ्यांच्या स्ट्रीपच्या स्वरुपात उपलब्ध होईल. त्यातील प्रत्येक गोळीची किंमत ४९ रुपये असणार आहे.