प्रत्येक घरात इंटरनेट पोहचविण्यासाठी बीएसएनएलने लाँच केले नवीन पोर्टल

भारत सरकार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) प्रत्येक सोसायटी, गाव आणि घरात इंटरनेट पोहचविण्यासाठी आपले नवीन पोर्टल लाँच केले आहे. या अंतर्गत शहरापासून लांब असलेल्या गावात देखील इंटरनेट कनेक्शन लावता येणार आहे.

Image Credited – Amarujala

बीएसएनएलने बूकमायफायबर (BookMyFiber) नावाने पोर्टल लाँच केले आहे. याद्वारे लोक भारत फायबर कनेक्शन घेऊ शकतील. या पोर्टलवर जाऊन आपल्या भागानुसार व गरजेनुसार प्लॅन निवडावा लागेल. या पोर्टलवर 400-500 रुपयांपासून प्लॅन उपलब्ध आहेत.

Image Credited – Amarujala

जर तुम्हाला देखील आपल्या गावात अथवा घरी ब्रॉडबँड इंटरनेट लावायचे असल्यास, सर्वात प्रथम http://bookmyfiber.bsnl.co.in/ वर जावे. यानंतर तुमच्या भागाचे नाव, पिन कोड, राज्याचे नाव, तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकावा.

Image Credited – Amarujala

तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातील प्लॅन बाबतची माहिती मिळेल. यानंतर लोकेशनवर क्लिक करून सबमिट करा. रजिस्ट्रेशन पुर्ण झाल्यानंतर कंपनी स्वतः तुम्हाला संपर्क करेल व तुमच्या घरी ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन लावेल.