191 प्रवाशांना घेऊन येणारे विमान केरळ येथे रनवेवर घसरले, पायलटचा मृत्यू

केरळच्या कोझिहोड विमानतळावर एअर इंडियाचे विमान रनवेवर घसरल्याची घटना समोर आली आहे. रनवेवर विमान घसरल्यानंतर क्रॅश झाले व त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने दुबईवरून उड्डाण घेतले होते.  या विमानात 191 प्रवासी होते.

आज तकच्या वृत्तानुसार, एअर इंडिया एक्सप्रेस AXB1344, बोइंग 737 दुबईवरून कोझिकोटला येत होते. पावसामुले विमान रनवेवर उतरताच घसरले व दरीत पडले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले. विमानात 189 प्रवासी आणि 6 क्रू मेबर्स होते. यात 10 लहान मुलांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची एक टीम कोझिकोडला रवाना झाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी देखील मदत कार्य व वैद्यकीय सेवा पोहचवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.