धक्कादायक! आणखी एका कलाकाराची आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काही दिवसांपुर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या धक्क्यातून अद्याप कलाविश्व सावरलेले नसतानाच आता आणखी एका कलाकाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टिव्ही कलाकार समीर शर्माने मुंबईतील आपल्या घरी आत्महत्या केली आहे. समीर शर्माला ‘कहानी घर घर की’ या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली होती.

44 वर्षीय समीर शर्माने मलाड पश्चिम येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनुसार, या अभिनेत्याने 2-3 दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी. कारण जेव्हा पोलीस फ्लॅटवर पोहचले त्यावेळी बॉडी डिकंपोज होण्यास सुरुवात झाली होती. मला पोलिसांनुसार, समीरने या वर्षी फेब्रुवारीमध्येच हे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. बिल्डिंगच्या वॉचमनने समीरचे शव किचनमधील पंख्याला लटकलेले पाहिले. पोलिसांना कोणतेही सुसाईड नोट सापडलेली नाही.

समीर शर्माने अनेक टिव्हीवरील कार्यक्रमात काम केलेले आहे. त्याने कहानी घर घर की, ये रिश्ते हैं प्यार के, लेफ्ट राइट लेफ्ट, ज्योति, गीत हुई सबसे पराई, 2612, दिल क्या चाहता है, वीरानगली, वो रहने वाली महलों की, आयुष्मान भव, इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर, भूतू या कार्यक्रमात दिसला होता. सध्या तो ये रिश्ते हैं प्यार के या कार्यक्रमात शौर्या महेश्वरीची भूमिका साकारत होता. त्याने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.