टोयोटाने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्यूनरचे स्पेशल एडिशन (Toyota Fortuner TRD Limited Edition) लाँच केले आहे. कंपनीने फॉर्च्यूनर टीआरडीला केवळ डिझेल इंजिन आणि दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या व्हेरिएंटची किंमत 34.98 लाख आणि 36.88 लाख रुपये आहे. कंपनीच्या डिलरशीपकडे या स्पेशल एडिशनचे बुकिंग सुरू झाले आहे. फॉर्च्यूनर टीआरडी एडिशनला टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंटने डिझाईन केले आहे. फॉर्च्यूनरच्या इतर मॉडेलच्या तुलनेत टीआरडी एडिशन लूकला अधिक स्पोर्टी आहे. सोबतच यात काही नवीन फीचर देखील देण्यात आलेले आहेत.
टोयोटाने भारतात लाँच केले नवीन फॉर्च्यूरनेचे लिमिटेड एडिशन
स्पेशल एडिशन मॉडेलमध्ये टीआरडी बॅजिंग आणि रग्ड चारकोल ब्लॅक आर18 एलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. ड्युअल टोन रुफ आणि पर्ल व्हाईट ड्यूअल टोन कलर स्कीम एसयूव्हीला अधिक चांगला लूक देते. याशिवाय या लिमिटेड एडिशन फॉर्च्यूनरमध्ये एलईडी डीआरएलसोबत बाय-बिम एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प्स, रिअर कॉम्बिनेशन लॅम्प्स, क्रोम प्लेटेड डोर हँडल्स आणि विंडो बेल्टलाइन देण्यात आली आहे.
सर्वसाधारण मॉडेलपेक्षा यात अधिक फीचर्स देण्यात आले आहे. या एसयूव्हीमध्ये ऑटो फोल्ड ORVM, इल्युमिनेटेड स्कफ प्लेट आणि 360 पॅनोरमिक व्ह्यू मॉनिटर मिळते. याशिवाय एसयूव्हीमध्ये नेव्हिगेशन टर्न डिस्प्लेसोबत मोठे टीएपटी मल्टी-इंफॉर्मेंशन डिस्प्ले, 8-वे ड्रायव्हर अँड पॅसेंजर पॉवर सीट, रिअर एसी वेंट्ससोबत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 6-स्पीकर्ससोबत टचस्क्रीन ऑडियो सिस्टम, स्टेअरिंग व्हिल माउंटेड कंट्रोल्स आणि क्रूज कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.
सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 7 एयरबॅग्स, ब्रेक असिस्टसोबत व्हिकल स्टॅबिलिटी कंट्रोल, दूसरी रांगेत Isofix आणि टीथर अँकर, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, एबीएस, ईबीडी, इमर्जेंसी ब्रेक सिग्नल आणि इमर्जेंसी अनलॉकसोबत स्पीड ऑटो लॉकसारखे फीचर्स मिळतील. फॉर्च्यूनर टीआरडी एडिशनमध्ये 2.8-लीटर, 4-सिलेंडर डिझल इंजिन दिले आहे. हे इंजिन 177PS पॉवर आणि 450Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत येते. एसयूव्ही 2-व्हिल ड्राइव आणि 4-व्हिल ड्राइव पर्यायात उपलब्ध आहे.