रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका


नवी दिल्ली – केंद्र सरकारने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणाच्या सीबीआय चौकशीला परवानगी दिल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अचानक वेग आला आहे. याप्रकरणी रियाला ईडीने देखील चौकशीसाठी समन्स पाठवले असून तिचा सहकारी सॅम्युअलची ईडी चौकशी करत आहेत. रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाने प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची केव्हाही चौकशी करण्याची शक्यता आहे.

रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. आपल्या तक्रारीत त्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. पैशांसाठी सुशांतला रियाने फसवल्याचेही त्यांनी यात म्हटल्यामुळे सुशांत प्रकरण मनी लँडरिंगशी संबंधित असल्यामुळे ईडीने गुन्हा दाखल केला आहे. रियाला तिच्या मुंबईतील घरी आणि ईमेलमार्फत ईडीने समन्स पाठवले आहे. रियाची तीन भागांमध्ये ईडीची मुंबई येथील शाखेत चौकशी होणार आहे. रियाचा सहकारी सॅम्युअल मिरांडाची काल ईडीने चौकशी केली आणि आज देखील चौकशी सुरु आहे.

बिहार सरकारच्या शिफारसीनंतर केंद्राने सुशांत प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले आहे. तसेच रियाच्या वकिलांकडून सादर केलेल्या अंतरिम संरक्षणाची (प्रोटेटिव्ह ऑर्डर) विनंती सर्वोच्च न्यायालयाने देखील नाकारली आहे. चांगल्या प्रतिभावंत अभिनेत्याचा असा मृत्यू झाला. त्यामुळे याबाबत खरे काय आहे ते सर्वांसमोर आले पाहिजे. आता रियाची चौकशी बिहार पोलीस करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.