मृत्युदर कमी करण्यात प्लाझ्मा थेरेपी प्रभावी नाही – एम्स

प्लाझ्मा थेरेपी कोरोनाच्यामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी नसल्याचे एम्स दिल्लीच्या एका परीक्षणात समोर आले आहे. एम्सने 30 रुग्णांवर केलेल्या चाचण्यांच्या आधारावर हा अंदाज वर्तवला आहे. डॉक्टरांना आढळले की प्लाझ्मामुळे मृत्यूदर कमी झालेला नाही. मात्र एका दुसऱ्या मोठ्या अभ्यासात थेरेपीमुळे जीवित राहण्याची शक्यतेमध्ये सुधारणा झाल्याचे आढळले आहे.

मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातून प्लाझ्मा घेऊन संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यास जोर दिला जात होता. मात्र आता एम्सच्या या अभ्यासाने या शक्यता आता फेटाळल्या आहेत.

एम्सचे संचालक डॉ. रणदीव गुलेरिया म्हणाले की, हे सुरुवातीचे विश्लेषण आहे. 15 रुग्णांचे दोन समूह होते, ज्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी परीक्षण करण्यात आले. एका समूहावर सामान्य उपचार करण्यात आले, तर दुसऱ्यावर सामान्य उपचारासह प्लाझ्मा देण्यात आला आहे.

गुलेरिया म्हणाले की, परीक्षणात आम्हाला आढळले की मृत्यूदर  दोन्ही समूहामध्ये समान नव्हते. रुग्णांवर याचा जास्त परिणाम झाला नाही. आपल्याला यावर अधिक निष्कर्ष काढण्यासाठी अधिक पुरावे हवेत. वर्तमान परीक्षणाद्वारे लक्षात येते की प्लाझ्मा थेरेपी सुरक्षित आहे. याद्वारे कोणत्याही रुग्णाला नुकसान पोहचत नाही. मात्र सोबतच यामुळे जास्त प्रभावही पडत नाही.