चेतन भगतची भविष्यवाणी, सांगितले या दिवशी येणार कोरोनाची लस

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम अनेक देशात सुरू आहे. काही लसींचे ट्रायल अंतिम टप्प्यात देखील पोहचले असल्याने, यात यश मिळाल्यास लवकरच लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी कोरोना लस बाजारात कधी येईल याविषयी अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.

चेतन भगत यांनी ट्विट केले की, जगभरातील शेअर बाजार आणि खासकरून अमेरिकेचा शेअर बाजार पाहून असे वाटत आहे लस लवकरच येत आहे. मला वाटते, सर्व ट्रायल ऑक्टोबर 2020 पर्यंत पुर्ण होतील. डिसेंबर 2020 पर्यंत परवानगी मिळेल आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत लस तुम्हाला टोचलेली असेल.

सोशल मीडियावर चेतन भगत यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे. अनेक युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत व हा अंदाच खरा व्हावा अशी आशा करत आहेत.