सुशांत प्रकरणात CBI ने केली SIT ची स्थापना, रियासह 6 जणांविरोधात एफआयआर दाखल

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयकडून सुचना मिळाल्यानंतर आता तक्रार दाखल करत तपासास सुरुवात केली आहे. सीबीआयने या प्रकरणात रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. सीबीआय बिहार पोलिसांच्या देखील संपर्कात आहेत.

सुशांतच्या प्रकरणाची चौकशी वेगळी टीम करणार असून, यासाठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी मनोज शशिधर आणि डीआयजी गगनदीप यांच्या नेतृत्वाखील केली जाईल. तपासासाठी अनिल यादव यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ईडी देखील 7 ऑगस्टपासून रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे.

दरम्यान, बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, दिशा सालियानच्या मृत्यूचा सुशांतच्या मृत्यूशी थेट संबंध आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून बिहारच्या अधिकाऱ्याला मिळालेल्या वाईट वागणुकीवर देखील त्यांना नाराजी व्यक्त केली.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात पटणामध्ये एफआयआर नोंदवली होती. यानंतर बिहार पोलीस चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होते.