कोरोनाबाधित असल्याच्या अफवेवर वैतागला ब्रायन लारा


काल दिवसभर सोशल मीडियावर वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याला कोरोना झाल्याची चर्चा रंगली होती. त्यावर आज अखेर ब्रायन लारा मौन सोडले आणि सत्य समोर आणले. दरम्यान काल दिवसभरात मागील 24 तासांत लाराच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी नेटिझन्सच्या पोस्टचा पाऊस पडला.

कोरोनाबाधित असल्याचे वृत्त सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर लाराने आपले स्पष्ट मत मांडत त्याने अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आपला कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले. याबाबत माहिती देताना त्याने सांगितले की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्याबाबत मला तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे आहे. हे वृत्त खोटे असल्यामुळे आधीचमुळे तणावात असलेल्या लोकांमध्ये त्याने भीतीचे वातावरण बनत आहे.