बैरुत धमाक्यानंतर चेन्नईमधील 700 टन अमोनियम नायट्रेटबाबत व्यक्त केली जात आहे चिंता

लेबनानच्या बैरुत येथे असुरक्षितरित्या ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आता भारतात स्टोर करण्यात आलेल्या स्फोट केमिकलबाबत चिंता वाढवली आहे. तामिळनाडूमधील चेन्नईच्या बाहेर कस्ट विभागाच्या अंतर्गत अनेक वर्षांपासून स्टोर करण्यात आलेल्या जवळपास 700 टन स्फोटक रसायनांबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की याचा मोठा साठा शिवकाशी येथील एका ग्रुपला पाठवला जाणार होता. याला 2015 साली चेन्नई बंदरावर जप्त करण्यात आले होते. तेव्हापासून हा साठा येथेच पडून आहे. तर चेन्नई बंदराच्या अधिकाऱ्यांनी बंदराच्या जागेत या रसायनाचा साठा नसल्याचे म्हटले आहे. जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जवळपास 36 कंटेनर, ज्यात प्रत्येकात 20 टन अमोनियम नायट्रेट आहे. त्याला आधीच स्थानांतरित केले आहे व आता ते सीमाशुल्क विभागाच्या नियंत्रणात आहे.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या जवळ कंटेनर डिपोमध्ये 690 अमोनियम नायट्रेट आहे. आम्ही त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत व लवकरच त्यावर कामही केले जाईल. दरम्यान, बैरुत स्फोटाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमधील या साठ्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे. पीएमके पक्षाचे प्रमुख डॉ. रामदास यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त करत, याबाबत पावले उचलावी अशी मागणी केली आहे.