…म्हणून ट्विटरवर ट्रेंड होत आहे #DhanyawadBalasaheb हॅशटॅग


मुंबई – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आज आठवण काढली जात असतानाच बाळासाहेबांच्या आठवणी शिवसेना तसेच इतर नेते शेअर करत असताना बाळासाहेब ठाकरेंचे नाव ट्विटरवर देखील चर्चेत आहे. ट्विटरवर भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत असून #DhanyawadBalasaheb यामध्ये टॉप ट्रेंडमध्ये आहे. अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचे सांगत नेटकरी त्यांच्या प्रति आभार व्यक्त करत आहेत.

अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते सोहळा पार पडला आहे. अयोध्येत या कार्यक्रमासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत. भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात एक ट्विट केले आहे.

सकाळी दहा वाजता संजय राऊत यांनी कोणताही कॅप्शन न देता एक फोटो ट्विटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील मजकूर आहे. फोटोमध्ये भगवा झेंडा असणारा राम मंदिराचा घुमट दिसत आहे. भगव्या रंगाच्या या पोस्टकार्डमध्ये श्री असे अक्षर लिहिण्यात आले आहे. पण त्या श्रीवरील वेलांटीऐवजी तिथे शिवसेनेचे चिन्ह असणारे धनुष्यबाण दाखवण्यात आला आहे. श्री या अक्षराच्या बाजूला, “बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती” असे लिहिण्यात आले आहे. फोटोच्या तळाशी, “गर्व से कहो हम हिंदू है” असे वाक्य आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. देशभरात त्यांच्या भूमिकेवरुन वादळ उठले होते. पण शिवसेना या पक्षाची या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ हा नारा याच काळातील होता. त्यामुळे अयोध्या प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एक अनोखे नाते असल्यामुळेच प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केले जात आहे, त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन उपस्थित झाले आहेत.

बाळासाहेबांनी अगदी रोखठोक भूमिका बाबरी मशीद पाडल्यानंतर घेतली होती. कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली. सकाळी दहाच्या सुमारास लाखोंच्या संख्येत येथे कारसेवक जमले होते. त्यानंतर देशात प्रचंड सांप्रदायिक दंगेही उसळलेले बघायला मिळाले होते. अयोध्येत झालेल्या या घटनेनंतर बाळासाहेबांनी नेहमीच्या शैलीत यावर भूमिका मांडली होती.

साडेतीन हजार हिंदूंची देऊळ पाडण्यात येऊन त्यांच्या मशिदी बांधण्यात उभ्या राहिल्या. साडेतीन हजार, आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदी द्या. बाबरी जी पडली, दोन पाडायच्या आहेत आणि ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा तुमच्याकडे. घाला लोटांगण, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

बाबरी पाडली ही गौरवाचीच गोष्ट आहे. त्यात लाजण्यासारखे काही नाही. बाबरी मशीद पाडली गेली, कारण त्या खाली राम मंदिर होते. इतिहास असे म्हणतो की, बाबराने हिंदू देवळे पाडली. आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत, मशिदीच्या जागी देवळे उभी करू, यात मुस्लिमांनी सहभागी व्हायला, असेही बाळासाहेब इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.