सॅमसंगचे ‘गॅलेक्सी नोट 20’ सीरिजमधील दोन शानदार स्मार्टफोन लाँच

सॅमसंगने आपले बहुप्रतिक्षित गॅलेक्सी नोट 20 आणि गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा हे दोन स्मार्टफोन अखेर लाँच केले आहेत. गॅलेक्सी नोट 20 ला मागील वर्षीच्या गॅलेक्सी नोट 10 चे अपग्रेड व्हर्जन म्हणून सादर करण्यात आलेले आहे. दोन्ही गॅलेक्सी नोट 20 सीरिजचे स्मार्टफोन एस पेन स्टाईलने सुसज्ज आहेत. यात पंच-होल डिस्ल्पे मिळेल. दोन्ही फोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे.

गॅलेक्सी नोट 20  स्पेसिफिकेशन आणि फीचर्स –

ड्युअल सिम (नॅनो+ई-सिम) सपोर्ट गॅलेक्सी नोट 20 अँड्राईड 10 वर आधारित वन यूआयवर चालतो. यात 6.7 इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) इन्फिनिटी-ओ सुपर एमोलेड+ डिस्प्ले आहे. ज्यात 60Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशिओ मिळतो.  स्मार्टफोन दोन प्रोसेसर पर्यायांमध्ये येतो, जे बाजारावर अवलंबून आहेत. यात ऑक्टा-कोर एक्सिनॉस 990 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ चिपसेट मिळेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मिळेल. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेज वाढवता देखील येईल.

Image Credited – ZDNet

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्याचा प्रायमेरी कॅमेरा एफ/2.0 अपर्चरसोबत 64 मेगापिक्सल आहे. अन्य दोन कॅमेरा प्रत्येकी 12 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यात 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 5G, 4G एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळेल. यात 4300 एमएएचची बॅटरी मिळते, जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.  सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 एस पेनसोबत येतो. ज्यात 26 मिलीसेकेंदची लेटेंसी असते.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 च्या 5जी, 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999.99 डॉलर्स (जवळपास 75,400 रुपये) आहे. याचे 5जी मॉडेल 128 जीबी, 256 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहेत. तर 4जी व्हेरिएंटमध्ये 256 जीबी स्टोरेज मिळेल.

Image Credited – Yahoo Finance

गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा स्पेसिफिकेशन आणि फीचर्स –

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रामध्ये देखील ड्युअल सिम (नॅनो+ई-सिम) सपोर्ट मिळेल. हा फोन अँड्राईड 10 वर आधारित वन यूआयवर चालतो. यात 6.9 इंच WQHD (1,440×3,200 पिक्सल) इन्फिनिटी-ओ डायनामिक एमोलेड 2एक्स डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz  आणि  आस्पेक्ट रेशिओ 20:9 आहे. हा फोन देखील दोन प्रोसेसर सोबत येते. जे बाजारावर अवलंबून आहे.  यात ऑक्टा-कोर एक्सिनॉस 990 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ चिपसेटचा पर्याय मिळेल. फोनमध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज पर्याय मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायाचे तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील प्रायमेरी सेंसर कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. सेकेंडरी कॅमेरा 12 मेगापिक्सल असून, तिसरा कॅमेरा एक लेजर ऑटोफोकस मॉड्यूल आहे. सेल्फीसाठी यात देखील 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Image Credited – India Today

कनेक्टिव्हिटी फीचरबद्दल सांगायचे तर 5G, 4G एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. याशिवाय वायरलेस DeX सपोर्ट देखील मिळतो, जो गॅलेक्सी नोट 20 अल्ट्राला मिनी पीसीमध्ये बदलेल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आले आहे. यात देखील एस-पेन देण्यात आला आहे. फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, जी फार्स्ट आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

गॅलेक्सी नोट 20 अल्ट्राच्या किंमतीबद्दल सांगायचे तर 128 जीबीच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 1299.99 डॉलर्स (जवळपास 97,500 रुपये) आहे. याचे 5जी व्हेरिएंट 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेजसह 12 जीबी रॅममध्ये उपलब्ध आहेत. तर 4जी व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 सीरिज भारतात कधी उपलब्ध होईल व किंमत काय असेल याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र पुढील महिन्यात याच्या लाँचिंगची शक्यता आहे.