‘… म्हणून मोदींनी भूमिपूजनासाठी आजचा दिवस निवडला’, राममंदिरावरून पाकची आगपाखड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. देशभरात या कार्यक्रमानिमित्ताने मोठा उत्साह होता. मात्र पाकिस्तानची यामुळे चांगलीच आखपाखड झाली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे पाकिस्तानचे रेल्वमंत्री शेख रशीद यांनी भारत आता धर्मनिरपेक्ष नाही तर रामनगरमध्ये बदलला आहे. भारत आता श्रीरामांच्या हिंदुत्वाचा देश बनला, असल्याचे म्हटले आहे.

रशीद म्हणाले की, पाकिस्तान अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीचा निषेध करतो. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 वर्षांपुर्वी अयोध्या यात्रेदरम्यान आपली इच्छा व्यक्त केली होती. मोदींना जाणूनबुझून राम मंदिर भूमिपूजनासाठी असा दिवस निवडला, जेव्हा काश्मिरला लागू असलेले कलम 370 हटवण्याच्या घटनेला एक वर्ष पुर्ण झाली आहेत.

प्रत्येक हिंदू नेत्याने बाबरी मशिद मुद्यावर राजकारण केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले.