अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान!


नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईत बिहार पोलिसांच्या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केल्यामुळे समाजासमोर चांगला मेसेज जात नाही, ज्यावेळी या प्रकरणात संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडूनही स्टेटस रिपोर्ट मागविला आहे.

संपूर्ण जगासह देशात मुंबई पोलिसांची चांगली प्रतिष्ठा असताना बिहार पोलिस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करून चांगला मेसेज गेलेला नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांचे कान टोचले आहेत. अभिनेता रिया चक्रवर्ती हिचा एफआयआर पाटणा पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने असे मुंबई पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकारकडून बिहार, महाराष्ट्र, केंद्र आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांबाबत स्टेट्स रिपोर्ट रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसांत मागविला आहे.

दरम्यान सुशांत मृत्यूच्या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईला पाठविलेल्या पाटणा पोलिस अधिकारी विनय तिवारी यांना “जबरदस्तीने” अलग ठेवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान, सांगितले की, बिहार सरकारने अभिनेता सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची केलेली शिफारस त्यांनी मान्य केली आहे. केंद्र सरकारने बिहार सरकारची मागणी मान्य केली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.