सोशल मीडियावर आज #JaiShreeRam आणि #BabriZindaHai टॉप ट्रेण्डमध्ये


अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. असे असले तरी सोशल मीडियावरही या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. ट्विटरवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे.

यामध्ये राम मंदिरासंदर्भातील सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्यांबरोबरच बाबरीचे समर्थन करणाऱ्यांकडून काही हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड केले जात असल्याचे दिसत आहे. #पधारोरामअयोध्या_धाम हा हॅशटॅग टॉप ट्रेण्ड असून दुसऱ्या क्रमांकावर #JaiShreeRam हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. तर #BabriZindaHai हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरीसंदर्भातील ट्विटमध्ये #BabriZindaHai हा हॅशटॅग एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वापल्याने तो ट्रेण्ड होऊ लागला आहे.

वेगवेगळ्या प्रकाराचे ट्रेण्ड ट्विटरवर सुरु असणाऱ्या हॅशटॅग वॉरमध्ये दिसून येत असले तरी प्रामुख्याने राम मंदिराच्या बाजूने बोलणारे आणि बाबरीच्या बाजूने बोलणारे असे दोन मतप्रवाह सोशल मीडियावर दिसून येत आहेत. आज सकाळी दहा वाजेपर्यंत टॉप ट्रेण्ड असणाऱ्या #पधारोरामअयोध्या_धाम हा हॅशटॅग वापरुन एक लाख ३३ हजार ट्विट करण्यात आले, तर ८३ हजारहून अधिक ट्विट #JaiShreeRam हॅशटॅगवर करण्यात आले आहेत. ३१ हजारहून अधिक ट्विट ट्रेण्डींग हॅशटॅगमध्ये तिसऱ्या स्थानी असणाऱ्या #BabriZindaHai हा हॅशटॅगचा वापर करुन करण्यात आले आहेत. चौथ्या क्रमांकावरील #RamMandir हॅशटॅगवर १ लाख ७२ हजार तर पाचव्या क्रमांकावरील #LandOfRavanan हा हॅशटॅगचा वापर करुन १३ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.