गायीचे दूध काढण्यासाठी चक्क ट्रॅक्टरचा वापर, आनंद मंहिद्रांनीही केले कौतुक

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गायीचे दूध काढण्यासाठी भन्नाट पद्धत शोधण्यात आली आल्याचे दिसत आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रांचे ध्यान देखील या पद्धतीने खेचून घेतले.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका ट्रॅक्टरचा उपयोग करून गायीचे दूध काढले जात आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही मनुष्याची विशेष मदत घेण्याची गरज नाही.  आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, लोक मला असे अनेक व्हिडीओ पाठवतात असतात, ज्या ट्रॅक्टरचा उपयोग ग्रामीण भागात विविध कामांसाठी केला जातो. मात्र हे माझ्यासाठी नवीन आहे. मला बिगर इंजिनिअर्सकडून जाणून घ्यायचे आहे की हे नक्की काय चालू आहे ?

व्हिडीओमधील व्यक्ती या प्रक्रियेविषयी माहिती देखील देत आहे. तो सांगतो की,  आपल्याला हवे तसे आपण या सिस्टमला सेट करू शकतो. तुम्ही वेगाने किंवा हळू कसे दूध काढायचे ते निवडू शकता. ट्रॅक्टरला चालू करावे लागले आणि एक्सलरेशन देण्याची गरज नाही. वॅक्यूम बनविण्यासाठी एअर सेक्शनला हटवावे लागेल व त्यानंतर दूध निघण्यास सुरुवात होईल. केवळ 2 ते 3 मिनिटात हे गायीचे दूध काढू शकते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ हात असून, युजर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.