विजयदुर्ग किल्ल्यांची दुरावस्था पाहून संतापला हेमंत ढोमे


सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी अभिनेता हेमंत ढोमे अनेक वेळा व्यक्त होत असतो. तो त्यांचा संताप समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर व्यक्त होत असताना अनेकदा व्यक्त करत असतो. त्याने यावेळीदेखील ट्विट करत गड-किल्ल्यांच्या झालेल्या दुरावस्थेविषयी राग व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव जपण्यास आपण कमी पडत असल्याचे तो म्हणाला आहे. आपल्या देशाला गड-किल्ले असे मोठे वैभव लाभले आहे. परंतु, सध्या हे गड-किल्ले जीर्णावस्थेत असल्याचे दिसून येते असल्यामुळे हेमंत संतापला आहे. विजयदुर्ग किल्ल्याचा ढासळलेल्या भागाचा फोटो शेअर करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राचे वैभव ढासळताना पाहुन खूप जास्त वाईट वाटतय… माफ करा महाराज… आम्ही तुमची खरी स्मारके जपायला कमी पडतोय.. #विजयदुर्गकिल्लावाचवा_अभियान”, असे ट्विट हेमंतने केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हेमंत ढोमे सक्रिय असून तो बऱ्याच वेळा या माध्यमातून व्यक्त होत असतो. यावेळीदेखील त्याने ट्विट केल्यामुळे अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.