‘रामचरित मानसमधील कोणता भाग शिकला?’, ‘त्या’ वादग्रस्त फोटोवरून थरुर यांनी भाजपवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. भाजपसाठी राममंदिराचा मुद्दा गेल्या अनेक निवडणुकीत महत्त्वाचा होता. या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर शुभेच्छा देणारा अनेक ट्विट व्हायरल होत आहे. मात्र कर्नाटक भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी ट्विट केलेल्या एका वादग्रस्त फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

शोभा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी हे प्रभू रामाचे बोट पकडून त्यांना मंदिराच्या दिशेने घेऊन जात आहेत. यात मोदींना मोठे तर प्रभू रामाला लहान बाळ असल्यासारखे दाखवले आहे. यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील या फोटोवरून त्यांच्यावर निशाणा साधला.  श्रीरामचरित मानसमधील कोणता भाग शिकला ?, असा सवाल देखील त्यांनी केला.

शशी थरुर यांनी ट्विट केले की, ना प्रेम शिकला, ना त्याग शिकला. करुणाही शिकली नाही, आपुलकीही शिकली नाही. स्वत: ला रामापेक्षा मोठे दाखणारे तुम्ही, श्री राम चरित मानसचा कोणता भाग शिकला आहात?