सलग दुसऱ्या महिन्यात खाण कामगाराने शोधला तिसरा दुर्मिळ रत्न


कोणाचे नशीब कधी फळफळेल याचा काही नेम नाही, अशाच आशयाचा प्रकार टानझनियामधील खाणीत काम करणाऱ्या कामगारासोबत घडला आहे. कोरोनाच्या संकटकाळात खाणीत काम करत असताना या कामगाराला अमुल्य रत्ने सापडली आहेत. त्या कामगाराचे Saniniu Laizer असे नाव आहे.

त्याला हे रत्न २४ जून २०२० रोजी खाणीत काम करत असताना सापडले आहेत. यामधील एका रत्नांचे वजन साधारण ९.२७ किलो आहे तर दुसऱ्या रत्नाचे वजन ५.१०३ किलो आहे. दोन्ही मौल्यवान रत्ने, जांभळ्या व निळ्या रंगाचे आहेत. तेथील सरकारने त्या कामगारास या दोन्ही रत्नांच्या मोबदल्यात जवळपास २५ कोटी ३६ लाख रूपये दिले आहेत. टानझनियामधील एका बँकेत सध्या ती दोन्ही मौल्यवान रत्ने ठेवण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन रत्न सापडून दोन महिने देखील पूर्ण झाले नाहीत, तर Saniniu Laizerने तिसऱ्या रत्नाचा शोध लावला. ६.३ किलो एवढे या रत्नाचे वजन आहे. खाणीत काम करणाऱ्या मजुराचा हा तिसरा मोठा शोध आहे. पूर्वीच्या दोन रत्नांप्रमाणे हे रत्नदेखील खूप मौल्यवान आहे. त्यामुळे येथील सरकार पुन्हा कामगारास सन्मानित करणार आहे.