कोरोना संकटात OYO चा कर्मचाऱ्यांना दिलासा, नाही होणार पगारात कपात

ऑनलाईन हॉटेल बुकिंग सेवा देणारी कंपनी ओयोने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी भारत आणि दक्षिण आशियामधील आपल्या कर्मचाऱ्यांना 1 ऑगस्टपासूनचा नियमित पगार देणार आहे. कोव्हिड-19 च्या संकटामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांची वेतन कपात आणि विना वेतन सुट्टी पाठविण्यासारखे निर्णय घेतले होते.

ओयोच्या एका प्रवक्त्यांनी सांगितले की, 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घेतला जात आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय ऑक्टोंबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने मागे घेतला जाईल.

ओयोने 22 एप्रिलला भारतातील आपल्या काही कर्मचाऱ्यांना विना वेतन 4 महिन्यांसाठी सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तर सर्व कर्मचाऱ्यांचा एप्रिल-जुलै 2020 च्या पगारात 25 टक्के कपात केली जाईल असे सांगितले होते.