केंद्र सरकारने स्वीकारली सुशांत मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीची शिफारस


आता दिड महिन्यांपेक्षा अधिकचा काळ बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला होऊन गेला आहे. त्यातच या प्रकरणाची मुंबई व बिहार पोलीस कसून चौकशी करत आहेत. पण अद्याप सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्यामुळे बिहार सरकारने यासंदर्भात केंद्राकडे सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्याला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार बिहार सरकारची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार आता सुशांत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. केद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.