पंतप्रधान मोदींच्या आईने टिव्हीवर पाहिला राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम, समोर आला फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राममंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींनी मंदिराची पहिली विट ठेवली. देशातील जवळपास 200 चॅनेल्सवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मोजक्याच लोकांना या कार्यक्रमाचे आमंत्रण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन यांनी देखील हा ऐतिहासिक क्षण टिव्हीवर पाहिला.

Image Credited – Aajtak

पंतप्रधान मोदींच्या आईंचा फोटो समोर आला आहे. ज्यात पंतप्रधान मोदी हनुमानगढी येथे आरती करत आहेत व हीराबेन टिव्हीच्या समोर बसून आपल्या मुलाला बघत आहे. फोटोमध्ये त्या हात जोडून बसलेल्या आहेत.

Image Credited – Aajtak

आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात पंतप्रधान मोदी साष्टांग प्रणाम करताना दिसत आहेत. त्यांच्या आई हे दृष्य टिव्हीवर पाहत होत्या.  त्यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत.