मशिदीच्या पायाभरणीला देखील जाणार का ? योगी आदित्यनाथ म्हणाले…

अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्यदिव्य अशा राममंदिराच्या भूमिपूजनचा कार्यक्रम पार पाडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष लक्ष दिले होते. आता कार्यक्रमानंतर आदित्यानाथ यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. राममंदिरानंतर अयोध्येतच निर्माण होणाऱ्या मशिदीच्या पायाभरणीला देखील जाणार का ? या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर दिले.

एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना प्रश्न विचारला की, भूमिपूजनाला सर्व धर्मातील लोक सहभागी झाली होती. अशामध्ये म्हटले जात आहे की येणाऱ्या काळात होणाऱ्या मशिदीची पायाभरणी कार्यक्रमाला  मुख्यमंत्री योगी जाणार नाहीत. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, माझे जे काम आहे ते मी करेल. बाकी ते तर काही मला बोलवणार नाही आणि मी देखील तेथे जाणार नाही.

योगी आदित्यनाथ म्हणाले, माझ्यासाठी हा भावनिक, उत्साहाचा, अभिमानाचा तो क्षणही होता. मला पक्ष आणि पंतप्रधान मोदींनी जे काम सोपवले, ते काम करण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.