प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण


देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिक अडकत असतानाच त्याची लागण आता राजकीय तसेच सिनेसृष्टीशी निगडीत लोकांना देखील होत आहे. त्यातच आता प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती बालसुब्रमण्यम यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत दिली. त्यांनी या व्हिडीओत आपल्याला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. त्यासोबत त्यांच्या आरोग्याविषयी चिंता न करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केले.

Posted by S. P. Balasubrahmanyam on Tuesday, August 4, 2020

माझी तब्येत गेल्या दोन-तीन दिवसांपासून बरी नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याचे त्यांनी या व्हिडीओत सांगितले. घरी क्वारंटाइनमध्ये राहिल्यास कुटुंबीय अधिक चिंतेत राहतील म्हणून बालसुब्रमण्यम यांनी स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. योग्य ते उपचार त्यांच्यावर रुग्णालयात सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आपल्या मित्रांना कॉल न करण्याची विनंती या व्हिडीओत बालसुब्रमण्यम यांनी केली.