एचडीएफसी बँकेच्या सीईओ आणि एमडीपदी शशिधर जगदीशन यांची नियुक्ती

देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एचडीएफसीच्या सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टरपदी शशिधर जगदीशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीईओ आदित्य पुरी यांच्या जागी जगदीशन यांची नियुक्ती करण्यास आरबीआयने मंजूरी दिली आहे. जगदीशन हे पुढील 3 वर्षांसाठी या पदावर कायम राहतील.

जगदीशन सध्या एचडीएफसी बँकेत एडिशनल डायरेक्टर आणि फायनान्स अँड हेचआर प्रमुख या पदावर कार्यरत होते. 2008 मध्ये ते बँकेशी चीफ फायनेंशियल ऑफिसर (सीएफओ) म्हणून जोडले गेले होते. 2019 साली त्यांच्या जागी श्रीनिवासन वैद्यनाथन यांना सीएफओ म्हणून नियुक्त करून त्यांना नवीन जबाबदारी सोपविण्यात आली होती. आदित्य पुरी यांनी काही दिवसांपुर्वीच नवीन सीईओबाबत थोडीफार माहिती दिली होती. ते म्हणाले होते की बँकेची पुढील सीईओ आणि एमडी ती व्यक्ती असेल, जी मागील 25 वर्षांपासून आमच्या सोबत आहे आणि बँकेच्या वाढीवर बारीक लक्ष देऊन आहे.

जगदीशन हे एक चार्टर्ड अकाउंटेंट आहेत. 1996 मध्ये ते एचडीएफसी बँकेत एक मॅनेजर म्हणून नियुक्त झाले होते. 1999 मध्ये त्यांना फायनान्स डिपार्टमेंटचे बिझनेस हेड बनविण्यात आले होते. आपल्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये त्यांनी फायनान्स ग्रुप हेड, ह्यूमन रिसोर्स, लीगल अ‍ॅड सेक्रेटेरियल, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, इंफ्रास्ट्रक्चर, कॉर्पोरेट कम्यूनिकेशन आणि कॉर्पोरेट रिस्पॉसिबिलेटी (सीएसआर) अशा विविध विभागांची दीर्घ अनुभव घेतला आहे.

त्यांनी फिजिक्समध्ये स्पेशलायजेशनसोबत पदवी आणि अर्थशास्त्रात देखील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबई यूनिव्हर्सिटी आणि यूनिव्हर्सिटी ऑफ शेफफिल्डमधून शिक्षण पुर्ण केले आहे.