यंदा ‘राहुल मोदी’ने देखील पास केली यूपीएससी परीक्षा, मिळाली 420वी रँक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा प्रदीप सिंहने संपुर्ण देशात पहिले स्थान मिळवले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसऱ्या स्थानावर प्रतिभा वर्मा आहे. यंदा एकूण 829 उमेदवारांनी यश मिळवले आहे.

मात्र यंदाच्या निकालात एक मजेशीर गोष्ट देखील पाहण्यास मिळत आहे. यावेळी टॉपर पेक्षा सर्वाधिक चर्चा 420व्या रँक मिळवणाऱ्याची होत आहे. याला कारणही तसेच खास आहे. निकालात 420वी रँक मिळविणाऱ्या उमेदवाराच्या नावाने सर्वांना हसवले आहे. या उमेदवाराचे नाव ‘राहुल मोदी’ आहे. राहुल मोदीचा रोल नंबर 6312980 आहे.

पास झालेल्या उमेदवारांची यादी समोर येताच याच नावाची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेटकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींशी हे नाव जोडत आहेत.

नेटकरी यावर मजेशीर मीम्स आणि जोक शेअर करत आहेत.